कर्क साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; महिलांना त्यांच्या कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल, प्रवासाचे योग येतील

    कर्क (Cancer) :

    आपले ग्रहमान पाहता कार्यालयीन कामकाजात आपणास अपेक्षित यश मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम आहे. महिलांना त्यांच्या कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. धार्मिक स्थळांना भेट देऊ शकाल. क्रीडा, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना मोठा दिलासा मिळेल. स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, पोटाच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.