तुळ साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; काही कौटुंबिक कारणांमुळे कामकाजाचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे

    तुळ (Libra) :

    एकूण ग्रहमान पाहता या सप्ताहात विविध गोष्टींबाबतच्या संघर्षाचे प्रसंग येण्याची शक्यता असल्याने आपली कसोटी लागणार आहे. संयमाने सर्व गोष्टी सोडविता येऊ शकतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रलोभनांपासून दूर राहणे योग्य राहील. स्थावर-जंगमबाबतचे प्रश्न सोडविता येतील. उद्योगधंद्याला चालना मिळेल. काही कौटुंबिक कारणांमुळे कामकाजाचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ छान राहील. प्रवास कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. अपचनासारख्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराशी जुळवून घ्या.