कन्या साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; आपण व्यवहारात चोख राहणे आवश्यक राहील

    कन्या (Virgo) :

    एकूण ग्रहमान पाहता हाती घेतलेली बहुतांश कामे मार्गी लागण्याचे समाधान मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम काळ असल्याने महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील, त्यांना एखादी संधी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नियमांचे पालन करा. आपण व्यवहारात चोख राहणे आवश्यक राहील. कौटुंबिक गोष्टींकडे, विशेषतः मुलांकडे अधिक लक्ष द्या. प्रकृती जपा, नियमित व्यायाम करा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.