साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर, २०२१ ते १ जानेवारी, २०२२; ‘या’ राशीच्या लोकांचे चालू आठवड्यात नवीन प्रेमसंबंध प्रस्थापित होतील

  मेष (Aries):

  लक्ष्मीकृपेचा या आठवड्यात आपल्यावर वर्षाव होईल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक पातळीवर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहोत्सुकांना यश मिळेल. दुपारनंतर मात्र तब्बेत बिघडू शकते. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबात विरोध होईल. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या भानगडीत फसू नये असा सल्ला श्रीगणेश देतात. वाहन चालवताना अपघातापासून जपा.

  वृषभ (Taurus) :

  श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार या आठवड्याचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सरळ पार पडतील आणि त्यांच्यापासून लाभ होईल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी चांगला काळ. सामाजिक आणि आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. एखाद्या मनोरम्य स्थळी जाण्यासाठी सहलीचे आयोजन कराल.

  मिथुन (Gemini):

  प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आनंददायक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य पण चांगले असेल दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. धनप्राप्तीचे योग आहेत. परिवारात सुख शांती नांदेल.

  कर्क (Cancer):

  या आठवड्यात आपणाला मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील असे गणेशजी सांगतात. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र खूप विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति सांभाळू शकाल. पैशाची चणचण भासेल.

  सिंह (Leo):

  अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य सतावेल. दुपारनंतर परदेशातून वार्ता येतील. संततीविषयक काळजी राहील. वरिष्ठांशी केलेला व्यवहार तुमच्या मनाला दुःख देईल. तरीही प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. सासरच्या मंडळीसोबत बिघडलेले संबंध सुधरतील; अडकून पडलेला संपत्तीचा वाद मार्गी लागेल.

  कन्या (Virgo) :

  या आठवड्यात मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. दुपारनंतर मात्र जास्त संवेदनशील बनाल. मानसिक तणाव राहील. प्रसाधनांवर स्त्री वर्गाचा खर्च होईल. घर, जमीन, वाहन इ. चा सौदा जपून करा. ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने विद्यार्थ्यांना चांगला काळ. चालू आठवड्यात ज्वेलरी व्यवसायात जबरदस्त लाभ होईल. अडलेले पैसेही कर्जदार परत करतील.

  तुळ (Libra) :

  गणेशजी सांगतात की या आठवड्याचा दिवस आपणाला शुभ जाईल. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनावश होऊन वाहवत जाऊ नका. दुपारनंतर दिवस आनंदात जाईल. धंदा व व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील. आवडत्या मुलीच्या घरच्यांकडून लग्नाचा प्रस्ताव येईल. इच्छुकांचे साक्षगंध उरकण्याची तयारी केली जाईल. नवीन प्रेमसंबंध प्रस्थापित होईल.

  वृश्चिक (Scorpio) :

  या आठवड्यात धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. परिवारातील सदस्यांचे मन दुखावेल व ते नाराज होतील. दुपारनंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र आणि स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. बहीण- भावांच्या प्रेमाचा वर्षाव आपणांवर होईल असे गणेशजी सांगतात.

  धनु (Sagittarius):

  लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने या आठवड्याचा काळ शुभ आहे असे गणेशजी सांगतात. बौद्धिक चर्चेतून लाभ होण्याविषयी आपण विचार कराल. त्यात यशही मिळेल. कीर्ती वाढेल. या आठवड्यात जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे सहकार्य चांगले मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नात्यातील मुली/ मुलासोबत विवाह करण्याचे योग जुळून येतील.

  मकर (Capricorn) :

  या आठवड्यात आपले मन आनंदी राहील असे गणेशजी सांगतात. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. उक्तीवर संयम ठेवा. अचानक उद्भवणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. निर्णय शक्तीचा अभाव राहील. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपण आपले मन निराश होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.

  कुंभ (Aquarius) :

  या आठवड्यात हट्ट सोडा असे गणेशजी सुचवितात. भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आईकडून लाभ मिळेल. दुपारनंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन काम हाती घेऊ नका. बौद्धिक आणि तार्किक कामे करा. पोटाच्या तक्रारी राहतील. यात्रा- प्रवास शक्यतो टाळा.

  मीन (Pisces) :

  कोणाशी आर्थिक व्यवहार करू नका व वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेशजी देतात. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुप्रसंग उद्भवतील. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कुटुंबीयांकडून सुख मिळेल आध्यात्मिक बाबींवर मन एकाग्र होईल.