आधी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन केलं लग्न आता म्हणते संरक्षण द्या

जयकल्याणीने म्हटले की, दोघांनीही त्यांच्या मर्जीने लग्न केले आहे. तिने पुढे सांगितले की, माझ्या आई-वडिलांना आमचे नाते मान्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बाबू यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे पोलीस तक्रार देत तिचे अपहरण झाल्याचे म्हटले आहे.

    तामिळनाडू : तामिळनाडूचे मंत्री डॉ. पी. के. शेखर बाबू यांची नवविवाहित मुलगी जयकल्याणी हिने कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध तामिळनाडूच्या एका व्यावसायिकाशी पळून लग्न केले. यानंतर आता जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेचे कारण देत बंगळुरू पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. मंत्री पी. के. शेखर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने बंगळुरू शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांच्यासमोर सुरक्षेची मागणी केली आहे.

    पोलीस संरक्षणाची मागणी
    शेखर बाबू यांच्या मुलीने एका व्यावसायिकासोबत पळून लग्न केल्यानंतर बंगळुरू पोलिसांकडून संरक्षण मागितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांच्याकडे पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली आहे. जनकल्याणीने पत्रकारांना सांगितले की, तिचे सतीश कुमार यांच्याशी लग्न झाले आहे आणि दोघांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

    हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न
    जनकल्याणीने सांगितले की, तिला आणि तिच्या पतीच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे. या जोडप्याला लग्नासाठी मदत करणाऱ्यांनी माहिती दिली की, कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेल्या रायचूर येथील हलस्वामी मठात हिंदू रितीरिवाजांनुसार या जोडप्याचे लग्न झाले.

    वडिलांनी नाते मान्य नाही
    जयकल्याणीने म्हटले की, दोघांनीही त्यांच्या मर्जीने लग्न केले आहे. तिने पुढे सांगितले की, माझ्या आई-वडिलांना आमचे नाते मान्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बाबू यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे पोलीस तक्रार देत तिचे अपहरण झाल्याचे म्हटले आहे.