कार्यक्रम अर्धवट सोडून राणे परतण्याचे नेमके कारण काय ?

राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी मुलगा आमदार नितेश राणे यांना अटक करण्याच्या मुद्द्यावर वक्तव्य केले. नितेश राणे यांनी काहीही केलेले नाही. संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल म्हणून हे सर्व सुरू आहे, असे राणे म्हणाले.

    नागपूर (Nagpur) : केंद्रीय लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे समारोपीय सोहळ्याला प्रमुख पाहुणे होते. त्यानुसार त्यांचे सोमवारी आगमन झाले. राणे यांनी गडकरींसह प्रदर्शनाला भेट देऊन परतीचा मार्ग पत्करला. कार्यक्रम अर्धवट सोडून राणे परतण्याचे नेमके कारण काय, अशी चर्चा प्रदर्शनस्थळी रंगली होती.

    तत्पूर्वी, राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी मुलगा आमदार नितेश राणे यांना अटक करण्याच्या मुद्द्यावर वक्तव्य केले. नितेश राणे यांनी काहीही केलेले नाही. संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल म्हणून हे सर्व सुरू आहे, असे राणे म्हणाले. नितेश राणे अज्ञातवासात आहेत का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,’नितेश राणे अज्ञातवासात नाहीये. सिंधुदुर्गातच आहेत. ते आमदार आहेत. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही. आमच्यावर सूडाच्या भावनेने आरोप केले जात असतील तर कोर्टात जावे लागणार. सरकारला काय करायचे ते करू द्या. नितेश राणेंनी काहीही केले नाही. त्यांनी कोणालाही मारलेले नाही.’

    बोलणे घाईचे होईल
    ओबीसींचे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणही जाऊ शकते अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत विचारले असता या संबंधी भविष्यवाणी वर्तविणे चुकीचे होईल. जो निर्णय होईल तो ऐकल्यावर मत व्यक्त करणे योग्य राहील. सुक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून विदर्भाला भरपूर काही द्यायचे आहे, असेही ते म्हणाले.