राज्यातील ‘या’ भागात हलक्या पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज काय आहे? : वाचा सविस्तर

    मुंबई : रविवारी अवकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर हवामान आल्हाददायक झालं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा निवाळत आहे. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा निर्माण झालेला नाही.

    मात्र पुण्यात काही अंशी ढगाळ हवामानासह काही भागात हलक्या पावसाचा इशारा वेधशाळेने वर्तवला आहे. संपुर्ण कोकणात ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा,मध्य मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहिल, असं अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

    तसेच ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्यामुळे हवेत गारवा कायम आहे. 5 डिसेंबर नंतर हवामान कोरडे झाल्यानंतर दिवसाचं कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

    तसेच उत्तर भारतात 5 आणि 6 डिसेंबरला काश्मीर हिमाचल लडाख, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, या ठिकाणी मोठ्या स्परूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याने राज्यात गुलाबी थंडी येण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, राज्यभरात आज कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. 5 डिसेंबरला रविवारी राज्यात सुर्यदर्शन झालं. तसेच राज्यात पुढील आठ दिवसानंतर पारा घसरण्याची शक्यता आहे. पुढील आठ दिवसात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे, असं हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितलं आहे. राज्यात धुई, धुके, धुराळी पडणार असल्याने पिकांची काळजी घेण्याचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.