WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता कोणीही तुमचे वैयक्तिक चॅट पाहू शकणार नाही, कंपनीकडून भन्नाट फिचर लाँच

व्हॉट्सअपने काही काळापूर्वी चॅट लॉक फीचर लाँच केले होते, तरीही यूजर्सच्या चॅट लीक होत होत्या. अशा परिस्थितीत आता एक नवीन गुप्त फीचर लाँच केले आहे.

  जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसह व्हॉट्सअप युजर्सची संख्या जास्त आहे. व्हॉट्सअप (WhatsApp) कंपनीकडून आपल्या युजर्संना विशेष काहीतरी देण्यावर भर असतो. त्यात आता व्हॉट्सअपकडून नवं फीचर आणलं (WhatsApp New Feature) आहे. अलीकडेच WhatsApp ने एक नवीन गुप्त कोट चॅट फीचर लाँच (whatsapp secret code to chat lock n) केले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे वैयक्तिक चॅट सुरक्षित करू शकता. खुद्द मार्क झुकेरबर्गने त्यांच्या  व्हॉट्सअप चॅनलवर सिक्रेट चॅट फीचरची माहिती शेअर केली आहे. तुम्हालाही व्हॉट्सअपच्या या  नव्या फीचर बद्दला जाणून घ्यायचं असेल तर ही माहिती जाणून घ्या.

  काही दिवसापुर्वी व्हॉट्सअपने फोन नंबरऐवजी यूजर्सना युजरनेमच्या मदतीने चॅटिंगं करण्याचं नव फीचर आणण्यात येत असल्याची घोषणा केली होती. आात पुन्हा इंस्टाग्राम सुरक्षेच्या दृष्टीने नवं पाऊल उचललं असून नवीन सुरक्षा फीचर लाँच केलं आहे, आता कोणीही तुमचे वैयक्तिक चॅट पाहू शकणार नाही

  गुप्त चॅट फीचरमध्ये काय खास आहे?

  या वर्षी WhatsApp ने एक नवीन फीचर चॅट लॉक लाँच  केले. आता व्हॉट्सअपने गुप्त कोड फीचरचा समावेश केला आहे. हा संरक्षणाचा अतिरिक्त स्तर आहे. म्हणजे, तुम्ही तुमचा फोन दुसऱ्याला दिल्यास, तुमच्या वैयक्तिक चॅट लीक होण्याची शक्यता नाही. तुम्ही गुप्त कोड टाकल्यावर वापरकर्त्यांना लॉक केलेले चॅट फोल्डर दिसेल.

  चॅट लॉक फिचर कसं काम करतं

  सर्वप्रथम चॅट लॉक फीचर ओपन करा. यानंतर चॅट खाली स्वाइप करा.
  यानंतर, वरच्या उजव्या कोपर्यात दिसणार्‍या तीन डॉट्सवर टॅप करा आणि चॅट लॉक सेटिंग उघडा.
  कोड सेट करण्यासाठी गुप्त कोड टॅप करा. यानंतर तुम्ही शब्द आणि इमोजी एकत्र करून ते तयार करू शकता.
  यानंतर तुमचा कोड तयार करा आणि Next वर टॅप करा.
  नंतर कोडची पुष्टी करा आणि पूर्ण झाले वर टॅप करा.
  यानंतर Hide Lock Chat टॉगल करा.
  यानंतर, आपण लॉक करू इच्छित चॅटवर डावीकडे स्वाइप करा किंवा लॉग दाबा.
  लॉक चॅट वर टॅप करा.
  यानंतर, तुम्ही फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीने चॅट लॉक करू शकता.