संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

यावर्षी २५ सप्टेंबरपासून मान्सूनने परत फिरण्यास सुरुवात केल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास उशिराने सुरु केला आहे. मान्सून राजस्थानमधून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो.

    मुंबई : जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मात्र त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. काही ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र सप्टेबर महिन्यात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतू पाऊस सरासरीपेक्षा यावर्षी कमी पडला असताना, आता मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले आहे. राजस्थानमधून मान्सूनने उशिरानेच परतीचा प्रवास सुरु केला. तर राज्यात देखील लवकरत पाऊस परतीचा मार्गावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (when is the monsoon on its way back where will it rain for the next two days what has the weather department said)

    पुढील ४८ तास पाऊस पडणार

    दरम्यान, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा अलर्ट नाही. दक्षिण कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे पुढील ४८ तास राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि मुंबईत आणखी दोन दिवस पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आता ४ ऑक्टोंबरनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. यानतर पाऊस परतीचा मार्गावर असेल.

    मान्सूनला परतीचे वेध…

    यावर्षी २५ सप्टेंबरपासून मान्सूनने परत फिरण्यास सुरुवात केल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास उशिराने सुरु केला आहे. मान्सून राजस्थानमधून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो. परंतु यंदा उशिराने या वर्षी देशात मान्सूनने २ महिने आणि २३ दिवस आपला मुक्काम केला. तर महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला. कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या मार्गावर असणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.