
"तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीये, त्यामुळे कृपा करुन आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही ही कमी पडणार नाही". असा थेट इशारा निंबाळकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत दरी पडण्याची शक्यता आहे.
बीड : महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही म्हणत, “तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीत, तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”. असं म्हणत बीड मधील शिवसंपर्क अभियाना दरम्यान, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर जोरदार टीका केलीय.
उस्मानाबादेत आमचा पालकमंत्री आहे. तिथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो. मात्र बीडमध्ये उलट असल्याचं म्हणत, त्यांनी थेट धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागरांवर निशाणा साधला आहे.
“तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीये, त्यामुळे कृपा करुन आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही ही कमी पडणार नाही”. असा थेट इशारा निंबाळकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत दरी पडण्याची शक्यता आहे.