राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

राज्यात  800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तरच लॉकडाऊन केला जाईल अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली होती, आता मात्र ओमायक्रॉनचा प्रसार असाच वाढत राहिला तर हीच मर्यादा 800 मेट्रिक टन वरुन 500 मेट्रिक टन वर आणावी लागेल आणि त्यानंतरच लॉकडाऊन केला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    जालना : राज्यात  800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तरच लॉकडाऊन केला जाईल अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली होती, आता मात्र ओमायक्रॉनचा प्रसार असाच वाढत राहिला तर हीच मर्यादा 800 मेट्रिक टन वरुन 500 मेट्रिक टन वर आणावी लागेल आणि त्यानंतरच लॉकडाऊन केला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    टोपे नेमकं काय म्हणाले? 

    नागरिकांनी निर्बंधाचे  पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला तर लॉकडाऊन आम्ही ठरवलं होतं. पण राज्यातील ओमायक्रॉनची स्थिती पाहता ही मर्यादा 500 टनावर आणावी लागेल.  दरम्यान सध्या निर्बंध लावण्याचा आमचा हेतू नाही मात्र काळजीपोटी हे प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील असेही टोपे म्हणाले.

    तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षा सबंधित पुढील काही दिवसातच पोलिसांच्या रिपोर्टनंतर गट क आणि गट ड या दोन्ही परीक्षा संबंधी निर्णय घेण्यात येणार असून भविष्यात परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  यापुढे राज्यात परीक्षा OMR पद्धतीने होणार नसून ती कोणत्याही ती घेण्यासाठी कोणत्याही खाजगी संस्थेकडे काम सोपवले जाणार नसल्याची देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.