श्रद्धाच्या वडिलांचा बांध फुटला
श्रद्धाच्या वडिलांचा बांध फुटला

श्रद्धा वालकर खून प्रकरणात सातत्याने धक्कादायक खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात दावा केला आहे की, आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दुबईतील एका महिलांसह अनेक महिलांशी मैत्री केल्याचा खुलासा केला आहे.

    नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणाला तीन महिने झाले आहेत. तरीही या प्रकरणी धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत. आता नुकतंच दिल्ली पोलिसांनी या हत्या प्रकरणाती खटल्यातील आरोपपत्रात दावा केला आहे की आरोपी आफताब पूनावालाची (aftab poonawala) दुबईतील एका महिलेसह अनेक महिलांशी मैत्री होती आणि ही मैत्रीच या दोघांच्या वादाच कारण ठरली लिव्ह-इन पार्टनर यावरुन श्रद्धाला त्याच्यावर शंका होती, आणि यावरून त्यांच्यात वादावादी झाली.

    पोलिसांच्या आरोपपत्रात काय?

    1. आफताब अमीन पूनावालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचा आणि तिच्या शरीराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. आफताब जेव्हा मुंबईत हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा करत होता तेव्हा त्याने दोन आठवड्यांच्या butchering course  कोर्सला भाग घेतल्याचे पोलिसांच्या आरोपपत्रात उघड झाले आहे.

    2. श्रद्धाने पोलिसांनी तपासलेल्या एका साक्षीदाराला असेही सांगितले की पूनावाला तिला मारहाण करायचा म्हणून आजारपणाचे कारण सांगून ती अनेकदा कामावरून सुट्टी घेत असे.

    3. पूनावालाने चौकशीदरम्यान उघड केले की, त्याची अनेक महिलांशी मैत्री होती, ज्यात दुबईत राहणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. आफताबची नागपुरात राहणाऱ्या एका महिलेशी आणि गुरुग्राममध्ये राहणाऱ्या आणखी एका महिलेशीही मैत्री होती. अशीही माहिती समोर आली आहे.

    4. आरोपपत्रात म्हटले आहे की, श्रद्धाला आफताबनं फसवणूक केल्याचा संशय होता. त्यांच्या भांडणाचा हा मुख्य मुद्दा होता, असा खुलासाही त्याने केला. या मुद्द्यांवरून तो तिला मारहाण करत असे.

    5. श्रद्धाच्या मृत्यूनंतर पूनवाला यांनी एका महिलेशी मैत्री केली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे. जेव्हा ती मुलगी आफताबला  भेटायला त्याच्या घरी गेली तेव्हा तिला कळू नये म्हणून आफताबने श्रद्धाचा मृतदेह रेफ्रिजरेटरमधून किचन कॅबिनेटमध्ये हलवला होता.

    6. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL), रोहिणीच्या टीमने फ्लॅटची खोली, वॉशरूम, फ्रीज आणि किचनची तपासणी केली होती. आरोपींनी  श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवलेल्या खालच्या किचन कॅबिनेटच्या प्लायबोर्डच्या मागील बाजूस रक्ताचे डाग आढळून आले.

    7. आफताबने कबूल केले की जेव्हाही त्याची मैत्रीण फ्लॅटवर यायची तेव्हा त्याने रेफ्रिजरेटर साफ करुन ठेवत असे आणि श्रद्धाच्या शरीराचे अवयव खालच्या स्वयंपाकघरातील कॅबिनेटमध्ये ठेवले. तर,  तिचं डोके, धड आणि दोन्ही हात फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच त्याने  श्रद्धाची अंगठीही त्याच्या नवीन मैत्रीणीला दिली होती.

    8. आफताबनेच्या मैत्रीणीने पोलिसांना एक अंगठी दिली जी आफताबने तिला गिफ्ट केली होती. तेव्हा तिने सांगितले होते की ही तीच अंगठी आहे जी त्याला आफताबने श्रद्धाला  भेट म्हणून दिली होती. ती अंगठी नंतर त्याच्या दोन मित्रांनीही ओळखली.

    9.  चार्जशीट नुसारप, श्रद्धा मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करत होती आणि आफताबने तिला मारहाण केल्यामुळे ती कार्यालयात येऊ शकत नसल्याचे तिच्या टीम लीडरला सांगितले होते.

    10. तर श्रद्धाने तिच्या टीम लीडरला असेही सांगितले की पूनावालाच्या मारहाणीमुळे ती अनेकदा रजा घेते आणि आजारी असल्याचे नाटक करते. 18 मार्च 2021 रोजी तिने नोकरी सोडली.

    11. आरोपपत्रानुसार, श्रद्धाच्या मित्राने पोलिसांना सांगितले की, जुलै 2021 मध्ये  श्रद्धाने तिला सांगितले होते की जर ती आफताबसोबत राहिली तर तो तिची हत्या करेल.

    12. “आरोपी पूनावाला हे  श्रद्धासोबत अनेकदा हिंसक होत होता आणि त्यांचे संबंध चांगले नव्हते, हे विधानांवरून स्पष्ट होते,” आरोपपत्रात म्हटले आहे.

    13. प्राथमिक चौकशीदरम्यान पूनावाला उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे.  श्रद्धा गेल्या वर्षी ५ मे रोजी त्याला सोडून अज्ञातस्थळी गेल्याचे तो सांगत होता.

    14. आफताबने 18 मे रोजी रात्री 10 वाजता श्रद्धाची हत्या केली. त्याने २७ वर्षीय श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्याच्या शरीराचे 35 ते 36 तुकडे करण्यात आले होते.

    15. आफताब सध्या तो तिहार तुरुंग क्रमांक-4 मध्ये कैद आहे. त्याचे संशयास्पद चारित्र्य पाहता त्याला इतर कैद्यांपासून वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, जेणेकरून त्यावर लक्ष ठेवता येईल.