पोलिस बनून 25 हजार लुटून पसार होताना ‘तोतया’ला पोलिसांनी घेतले ताब्यात

वृद्ध ताराचंद शामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी काल वलगावच्या बँकेमधून 25 हजार रुपय काढले होते आणि आज अमरावती शहराच्या चित्रा चौकात काही खरीदी करण्यासाठी ते आले असताना एका फुटाण्याच्या दुकानात गेले असता यावेळी एक अज्ञान इसमाने दाखल होऊन वृद्ध व्यक्तीला मी पोलिस असल्याची बतावणी केली.

    वृद्ध ताराचंद शामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी काल वलगावच्या बँकेमधून 25 हजार रुपय काढले होते आणि आज अमरावती शहराच्या चित्रा चौकात काही खरीदी करण्यासाठी ते आले असताना एका फुटाण्याच्या दुकानात गेले असता यावेळी एक अज्ञान इसमाने दाखल होऊन वृद्ध व्यक्तीला मी पोलिस असल्याची बतावणी केली. पाचपोर यांच्या खिशातील 25 हजार रुपये काढून त्यांचे हात पकडून हा इसम त्यांना सोबत घेऊन गेला.
    काही अंतरावर गेल्यावर तिथून पळ काढताना तोतया पोलीस असल्याचे समजताच पाचपोर यांनी आरडाओरड केली. यानंतर त्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलिस स्थानकात तक्रार प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांनी तात्काळ आपले पोलीस पथक सरोज चौकात रवाना केल्यानंतर त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. हा तोतया पोलिस बुलढाणा जिल्ह्यातील असून आजम खान अफजल खान पठाण या आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीविरुद्ध अनेक इतर जिल्ह्यांमध्ये तोतयागिरी करण्याचे गुन्हे असण्याची दाट शक्यता असल्याचे त्यासोबतच कोतवाली बस स्टॅन्ड जवळील एक मंगळसूत्र चोरीची कबुली देखील दिल्याचे पोलिस सांगतात. पुढील तपास सिटी कोतवाली पोलिस करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.