महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणारा इम्तियाज जलील कोण?; चंद्रकांत खैरेंचा खोचक सवाल

महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा होणारच. पुतळ्याला कोणी विरोध केला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला. 

    औरंगाबाद : वीर शिरोमणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान व आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच आज हिंदुस्थानात हिंदू जीवंत आहेत. महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा होणारच. पुतळ्याला कोणी विरोध केला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.

    तसेच महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणारा इम्तियाज जलील कोण? त्यांचा काय संबंध असा सवालही यावेळी उपस्थित केला.

    जलील काय म्हणाले होते? 

    महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्याऐवजी सैनिकी शाळा सुरू करा अशी भुमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मांडल्याने त्यांच्या विरोधात राजपूत समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्याबरोबरच ते म्हणाले, महापालिकेने ८७ लाखांचे बजेट तयार करून मान्यता घेतली आहे. नियमानुसार तिथे महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा बसवला जाणार आहे, आता केवळ निविदा काढणे बाकी आहे. त्या ठिकाणी पुतळा होणारच आहे.

    चंद्रकांत खैरे यांचा इशारा

    महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरूष आहेत. आमचे प्रेरणास्थान आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमच्या धर्मावर आकस ठेवून बोलण्याचे काम खासदार करत आहेत. वातावरण खराब करण्याचे ते कम करतात. एमआयएम खासदाराचे राजकारण आता लोकांच्या ध्यानात आले आहे. महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा होणारच. विरोध करताना आपण कोणाला विरोध करतोय हे आधी खासदारांनी समजून घ्यावे त्यांनी इतिहास वाचाव असा टोला लगावत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वेळप्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.