गिरीश बापट यांचा वारसदार कोण? पुण्यात ‘या’ नेत्याचे झळकले बॅनर्स; तर पवार, आव्हाडांकडून संताप, बापटांना जाऊन…

पुण्यात लोकसभेचीही पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत असताना, आज “गिरीश बापट यांना जाऊन ४ दिवस झालेत, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा”, असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना लगावला आहे. तर यावर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) देखील यावर संताप व्यक्त केला आहे.

पुणे : बुधवारी पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरीश बापट हे 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. दरम्यान, बापटांच्या निधनानंतर कसब्यानंतर आता पुण्यात लोकसभेचीही पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत असताना, आज “गिरीश बापट यांना जाऊन ४ दिवस झालेत, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा”, असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना लगावला आहे. तर यावर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) देखील यावर संताप व्यक्त केला आहे.

सूतक तरी संपू दे…

पुण्यात भावी खासदार असे बॅनर्स झळकल्यानंतर आणि गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा होत आहेत, यावर जितेंद्र आव्हाड संतापले. गिरीश बापट यांना जाऊन चार दिवस संपले नाहीत. १० दिवसांचे सुतक तर संपु द्या मग लावा बॅनर का तुम्ही वाटच बघत होतात आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत, तोवरच तुम्ही पॅड घालून तयार, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांचे सूतक तरी संपू दे, त्यानंतर पोटनिवडणुकीची चर्चा करा, असं म्हणत त्यांना या चर्चावर नाराजी व्यक्त केली.


जगदीश मुळीक यांचे झळकले बॅनर्स…

जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाचे मोठमोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर भावी खासदार जगदीश मुळीक असं लिहिलं आहे. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. मात्र, या बॅनर्सवर आता टीकाही होऊ लागली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे चार दिवसही झाले नाहीत अन् त्यांच्या जागेवर दावा करणारे मुळीक यांचे बॅनर्स झळकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुळीक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सबुरीन नाहीये का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. दरम्यान, या बॅनर्सवर टीका होऊ लागल्याने कल्याणी नगर परिसरातील बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत.

जनाची नाही तर मनाची तरी…

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन ४ दिवसच झाले आहेत. एवढी काय घाई आहे, माणूसकी आहे कि नाही, महाराष्ट्राची काही परंपरा आहे की नाही. लोक म्हणतील यांना थोडी तरी जनाची मनाची लाज आहे कि नाही. अजित पवार म्हणाले, गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर पुण्यात लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होत आहेत. यावर अजित पवार संतापले, कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही, असं म्हणत चर्चा करणाऱ्यांता त्यांनी समाचार घेतला.

राजकीय वर्तुळाच चर्चा…

दरम्यान, गिरीश बापट यांना जाऊन चार दिवसही तास होत नाहीत, तोवर त्यांच्या रिक्त जागी पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मागील महिन्यात कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. यात भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तर चिंचवडमध्ये चुरशीचा सामना झाला. दरम्यान, गिरीश बापट यांच्या मृत्यूला काही तास उलटत नाहीत, तोच मात्र त्यांच्या जागी लोकसभेची पोटनिवडणूक होणार का, यावर चर्चा रंगत आहे. यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहे. तसेच उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय, तर उमेदवारीवरुन देण्यावरुन वरिष्ठांमध्ये खलबतं सुरु असल्याचं समजते.