राज्यात सतत का होताहेत दंगली? आतापर्यंत कुठंकुठं दंगली झाल्यात दंगली…; दंगलीमागे कारण काय?

आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनसमोर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जमले असून, सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाईची मागणी हिंदुत्ववादी संघटनेनं केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यात दंगली का घडतोहेत, याचं कारण काय, पाहूया राज्यात आतापर्यंत कुठंकुठं घडल्या दंगली...

  मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून दोन गटात हाणामारी तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत, संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर आदी ठिकाणी दोन गटात दंगली घडल्या आहेत, यानंतर आता कोल्हापूरमध्येही (Kolhapur) किरकोळ कारणावरुन दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूरमध्ये मोबाईलवर (Mobile) औरंगजेब व टिपू सुलतानचे स्टेटस (Status) ठेवल्यामुळं दोन गटात हाणामारी झाल्यामुळं तणावाचे वातावरण झाले आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) तणावपूर्ण वातावरण असल्यामुळं कोल्हापूरात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनसमोर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जमले असून, सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाईची मागणी हिंदुत्ववादी संघटनेनं केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यात दंगली का घडतोहेत, याचं कारण काय, पाहूया राज्यात आतापर्यंत कुठंकुठं घडल्या दंगली…

  यावर्षी राज्यात कुठंकुठं दंगली…

  1. 30 मार्च- रामनवमीच्या एका दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल, पोलिसांच्या गाड्या जाळल्या, एकाचा मृत्यू, काही पोलीस जखमी

  2. 31 मार्च- छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ओहर गावात दोन गटांत दगडफेक

  3. 14 मे – अकोल्यात सोशल मीडियाच्या पोस्टवरुन दोन गटांत दंगल, एकाचा मृत्यू, 10 हून अधिक जखमी, अनेक गाड्यांची जाळपोळ

  4. 14 मे – अहमदनगर जिल्ह्यात शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीत दगडफेकीवरुन दोन गटांत दंगल, चार पोलीस जखमी

  5. 14 मे – नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात संदलच्या निमित्तानं काही मुस्लीम तरुणांचा शंकराच्या मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न, त्यावरुन काही काळ तणाव

  6. 24 मे- कोल्हापुरात पन्हाळगडावर मजारीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांकडून बंदचं आयोजन, धार्मिक स्थळाची डागडुजी

  7. 06 जून – अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चानंतर दंगल, दगडफेकीत अनेक वाहनांचं नुकसान, दगडफेकीत काही जण जखमी

  8. 7 जून – कोल्हापुरात औरंगजेब आणि टिपू सुल्तानचं स्टेटस लावण्यावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, तोडफोड, पोलिसांचा लाठीमार