पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासनदरबारी आवाज उठवणार : दत्तात्रय पाटील

पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीची नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

    पंढरपूर : पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीची नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. पंढरपूर सुरक्षा समितीचे नूतन शहराध्यक्ष दत्तात्रेय पाटील तसेच उपाध्यक्ष विजयकुमार कांबळे, कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, सचिव विश्वास पाटील व तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची निवड पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर शहरासाठी करण्यात आली.

    याप्रसंगी दत्तात्रय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकार सुरक्षा समितीतील पत्रकार सदस्य तसेच इतर पत्रकारांसाठी त्यांच्या मूलभूत हक्कासाठी तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पत्रकार सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वजण एक जुटीने लढा देऊ. पीडित पत्रकारांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, पत्रकारांच्या विविध मागण्या शासन दरबारी आग्रहाने मांडून पत्रकार बांधवांना न्याय देण्याचे काम मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

    या पत्रकार सुरक्षा समितीच्या निवडीच्या वेळी उपस्थित सोलापूर जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरोदे तसेच अन्य पत्रकार सदस्य दिनेश खंडेलवाल, रफिक आतार, कबीर देवकुळे पोतदार, बाहुबली जैन, चैतन्य उत्पात, नागटिळक, अमर कांबळे ,यादव, राजेंद्र काळे, रवींद्र शेवडे, नागटिळक, आदी पत्रकार उपस्थित होते.