शाळा, महाविद्यालये सुरू राहणार की नाही?; आदित्य ठाकरे म्हणाले…

आदित्य ठाकरे यांनी शाळा- कॉलेजच्या परिस्थितीवर पुन्हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की,सध्या नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. परंतु पुढील काळात शाळा , महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही? याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.

    मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे.

    दरम्यान आता महाराष्ट्रातही दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढतच चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याविषयी भाष्य केले आहे.

    आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

    आदित्य ठाकरे यांनी शाळा- कॉलेजच्या परिस्थितीवर पुन्हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की,सध्या नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. परंतु पुढील काळात शाळा , महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही? याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.’ तसेच काही मुलांनी दोन वर्षात शाळा पाहिलेलीच नाही अशी स्थिती आहे, याबद्दल निश्चितच दुःख आहे पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात, असेही ते म्हणाले.

    तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की,’सध्या गर्दी वाढली आहे. नाताळ, न्यू इयर असताना लोक काळजी जास्त घेत नाही. त्यामुळे मास्क लावणं गरजेचं आहे. लसीकरण झाल्यावरही मास्क घालावे लागणार आहे’, असेही ते म्हणाले.