Woman Has Panic Attack After Denied Boarding, Air India reaction

दिल्ली विमानतळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एअर इंडियाच्या एंट्री गेटजवळ एक महिला जमिनीवर पडताना दिसत आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानाच्या बोर्डिंग गेटवर प्रवेश नाकारल्याने महिलेला पॅनीक अटॅक आला आणि ती जमिनीवर पडल्याचा दावा केला जात आहे(Woman Has Panic Attack After Denied Boarding, Air India reaction).

    एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांनी सुरक्षेला बोलावून वैद्यकीय मदतीऐवजी त्यांना विमानतळाबाहेर पाठवले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एअर इंडियाने एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

    काय आहे संपूर्ण प्रकरण?

    विपुल भीमानी नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर टीका करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर एअर इंडियाने अधिकृत निवेदन दिले आहे.

    एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, बोर्डिंग गेट बंद झाल्यानंतर महिला आणि सोबतच्या दोन प्रवाशांनी तक्रार केली, तरीही त्यांना अनेक वेळा कॉल करण्यात आला. याव्यतिरिक्त, एअरलाइनने सांगितले की महिला पडल्यानंतर लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले, परंतु तिला बरे वाटू लागले आणि तिने कोणतीही वैद्यकीय किंवा व्हीलचेअर मदत नाकारली.

    एअरलाइनने म्हटले आहे की, “दिल्ली विमानतळावरील एअर इंडियाच्या प्रवाशाची घटना दर्शविणारी एक व्हिडिओ क्लिपिंग विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जात आहे. त्यात गेटजवळ पडलेल्या प्रवाशाबद्दल एअर इंडियाच्या उदासीनतेचे भ्रामक चित्र रंगवले आहे.

    एअर इंडिया नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोईला सर्वोच्च प्राधान्य देते. तथापि, एक जबाबदार विमान कंपनी म्हणून, आम्हाला नियामक प्राधिकरणांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही उड्डाणाला उशीर करणार नाही असे एअर इंंडियाने निवेदनात म्हंटले आहे.