कराडात महिलांचा ‘स्वच्छ व सुंदर कराड’ परिसंवाद उत्साहात

कराडच्या छत्रपती शिवाजी उद्यानात शनिवारी (दि.२५) महिलांचा ‘स्वच्छ व सुंदर कराड’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये शिवाजी हौसिंग सोसायटीतील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

  कराड : कराडच्या छत्रपती शिवाजी उद्यानात शनिवारी (दि.२५) महिलांचा ‘स्वच्छ व सुंदर कराड’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये शिवाजी हौसिंग सोसायटीतील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

  याप्रसंगी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, विजया कापसे, आस्मा खान, सुनिता शहा, अनुला लादे, तृप्ती पाटील, कल्याणी जाधव, अनुजा जाधव, श्रेया जोशी, वैशाली जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

  यावेळी नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका कश्मिरा इंगवले, अशोकराव शिंदे, सुभाष वाडिलाल शहा, नायब तहसीलदार मोहन डोळ, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, पौर्णिमा जाधव, विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव, प्रा. बी. एस. खोत आदी मान्यवर उपस्थित होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन सुनिता जाधव यांनी केले.

  अभिमानास्पद मनोगते

  कचरा गोळा करण्यासाठी ठरलेल्या वेळेत नियमित येणारी घंटागाडी, त्यावरील सिराज मोमिन यांनी लिहिलेले सुंदर गीत, ओला व सुखा कचरा वेगळा करण्याची महिलांना लागलेली सवय, कराडचे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय महत्व, परिसरातील आगाशिव लेणी, वसंतगड किल्ला, सदाशिवगड, कृष्णा कोयना नद्यांचा प्रीतिसंगम, वृक्षांनी वेढलेले कराड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले कराडचे चाळीस वर्षे नगराध्यक्ष राहिलेले स्व.पी.डी. पाटील यांनी कराडमध्ये केलेली भारतातील पहिली अंडरग्राउंड ड्रेनेज व्यवस्था, कराडमधील मंदीरे, ऐतिहासिक मनोरा, येथे प्राचीन काळापासून असलेली बाजारपेठ, उद्योगधंदे व कराडचे शैक्षणिक वैभव, अशाप्रकारे ‘माझे कराड स्वच्छ व सुंदर कराड’ अशी अभिमानास्पद मनोगते व्यक्त केली.

  महिलांनी ‘स्वच्छ कराड; सुंदर कराड’ परिसंवाद घेतल्याबाबत, तसेच स्वच्छता मोहिमेत महिलांनी हिरीहिरीने घेतलेल्या सहभागाबद्दल नगरपालिकेच्या वतीने अभिनंदन केले. तसेच सदर परिसंवादात कराड शहराने स्वच्छता मोहिमेत सलग तीन वर्षे देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल नगराध्यक्षा, नगरसेवक, मुख्याधिकारी व सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.

  – विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती, कराड नगरपालिका.