लग्नाच्या आमिषाने अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून मैत्रिणीला भोसरी आणि लातूर येथील लॉजवर नेऊन तसेच ट्रॅव्हल्स बसमध्ये लैंगिक अत्याचार केला.

    पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मैत्रिणीला भोसरी आणि लातूर येथील लॉजवर नेऊन तसेच ट्रॅव्हल्स बसमध्ये तब्बल नऊ ते दहा वेळेस लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तरूणाला भोसरी पोलीसांनी अटक केली आहे. तेजस तात्याराव सरवदे (वय २०, रा. वसवडी, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी तेजस आणि पीडित तरुणी हे मित्र-मैत्रीण आहेत. तेजस याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला लांडेवाडी येथील विश्व-विलास लॉजमध्ये आणि लातूर येथील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लांडेवाडी येथील भोसले पार्कींगमध्ये तेजस याने त्याच्या मालकीच्या ट्रॅव्हल्स बसमध्ये नेऊन देखील तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तब्बल नऊ ते दहा वेळा हा प्रकार घडला.