Women insecure in Mumbai? Woman stabbed in Churchgate local The thrilling scene was captured on a CCTV camera at Charney Road station

    मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, याच लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेवर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील चर्नी रोड रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे(Women insecure in Mumbai? Woman stabbed in Churchgate local The thrilling scene was captured on a CCTV camera at Charney Road station).

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. पीडित महिलेने वांद्रे रेल्वे स्थानकातून चर्चगेटला जाणारी लोकल रात्री 11.45 वाजता पकडली. पीडित महिला ही महिलांच्या डब्यातून प्रवास करत होती.

    चर्नी रोड रेल्वे स्टेशन येताच एक चैन स्नॅचरने महिलांच्या डब्यात प्रवेश केला. पीडित महिलेच्या गळ्यातील चैन पाहून त्याने ती खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पीडित महिलेवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिला जखमी झाली आहे.

    या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलांच्या डब्यात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    मुंबई लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटनांची वारंवार नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या घटना वाढतानाही दिसत आहेत. जवळपास तीन आठवड्यांपूर्वी नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीवर चोरीचे 10 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी बोरिवली जीआरपीकडेच पाच गुन्हे नोंद असल्याचंही समोर आले होते.