16 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन; माथाडी कामगार नेत्यांचा इशारा

    नवी मुंबई : शेतकरी व्यापारी 50 किलो पेक्षा जास्त माल मागवत असल्याने एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे जोपर्यंत 50 किलोपेक्षा कमी माल बाजार आवारात येणार नाही; अंमलबजावणी झाली नाही तर 16 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करू. तोपर्यंत माथाडी कामगार माल खाली करणार नाही, असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

    सकाळपासून कांदा बटाटा मार्केट बंद करुन माथाडी कामगारांनी आंदोलन सुरू केला आहे. वाहतूक करण्यात येणार्‍या मालाचे वजन 50 किलोपेक्षा अधिक नसावे. ही मागणी वारंवार करुनही अधिक वजनाच्या गोणी येत असल्याने माथाडी कामगार आज अधिकच संतापले आहेत.

    त्यामुळे आज सकाळपासूनच माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोणी मालाची वाहतूक करु नये, असा शासनाचा जीआर असताना एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाच्या जीआरनुसार 50 किलो वजनाचा गोणी अपेक्षित असताना काही व्यापार्‍यांकडे 60 ते 65 किलो वजनाचा माल येत आहे. असं नरेंद्र पाटील म्हणाले.