pic credit - social media
pic credit - social media

    नवी दिल्ली : 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्री जगाची लोकसंख्या तब्बल 800 कोटींचा आकडा ओलांडेल. 2023 मध्ये जगाची लोकसंख्या नेमकी किती वेगाने वाढली, याचे आकडे समोर आले आहेत. 1 जानेवारी 2014 ला जगाची लोकसंख्या 8,019,876,189 इतकी झालेली असेल तर 2023 मध्ये यात 75,162,541 लोकांची भर पडली आहे.

    अमेरिकेच्या लोकसंख्या ब्युरोच्या अहवालावरून हा दावा केला जात आहे. गेल्या एकाच वर्षात 7.5 कोटींची वाढ हा आकडा जगभरातील तज्ज्ञांना अचंबित करणारा आहे. जागतिक लोकसंख्येचे घड्याळ दर सेकंदाला एक हजार कोटी म्हणजे 10 बिलियनपर्यंत पोहोचायला 16.4 वर्षे लागतील. कोरोना साथीमुळे लोकसंख्येवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे.

    लोकसंख्या ब्युरोच्या अंदाजानुसार घटता जननदर आणि घटलेले लैंगिक गुणोत्तर या कारणांमुळे यानंतर पुढचा 100 कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी, म्हणजे जगाची लोकसंख्या 900 कोटी होण्यासाठी आणखी 14 वर्षाहून थोडा अधिक काळ लागणार आहे. 2021 मध्ये जागतिक सरासरी आयुष्यमान 4.3 जन्म आणि 2 मृत्यू या दरावर स्थिर आहे. मात्र, जागतिक विकासदर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये एक टक्क्याने कमी झाला आहे.

    2012 मध्ये होती 700 कोटी लोकसंख्या

    नोव्हेंबर 2022 मध्ये फोर्ब्सच्या एका अहवालानुसार 2012 मध्ये जगाची लोकसंख्या 700 कोटी होती. त्यात कमी होऊन ते 71 वर्षांवर आले आहे. 100 कोटींची भर पडायला 11 वर्षे लागली. यूएनच्या महासचिव एंटोनिया गुटेरेस यांनी लोकसंख्या वाढीसाठी वैज्ञानिक प्रगती, चांगला आहार, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेमध्ये झालेल्या सुधारणेमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.