कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची आज पत्रकार परिषद, महिला कुस्तीपटुंच्या आरोपांना देणार उत्तर!

गेल्या दोन दिवसांपासून बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह अनेक आघाडीचे कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आगे.

    नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे राष्ट्रपती ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात देशातील अनेक प्रसिद्ध कुस्तीपटूंनी अनेक तक्रारी केल्या आहेत. या आरोपाचं खडंन त्यांनी यापुर्वीच केलय. मात्र, या प्रकरणी आज ते पत्रकार परिषद घेणार असून अनेक बाबींचा खुलासा होणार आहे.

    याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आज दुपारी 12 वाजता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील नवाबगंज येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषद घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या पत्रकार परिषदेबाबत काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

    संपूर्ण प्रकरण काय?

    दिल्लीच्या (Delhi) जंतर मंतर (Jantar Mantar) परिसरात भारतातील दिग्गज कुस्तीपटू (Legendary wrestlers of India) सध्या आंदोलनाला (Agitation) बसले आहेत. कुस्ती संघ त्यांचं शोषण करत असल्याचं या पेहलवानांचं म्हणणंय. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh, President of Indian Wrestling Association) हे या पेहलवानांच्या टार्गेटवर आहेत (Target On Wrestlers) . बृजभूषण सिंह हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

    एशियन गेम्समध्ये (Asian Games) पदकं मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Female Wrestler Vinesh Phogat) हिने तर बृजभूषण सिंह हे अनेक मुलींचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मुलींच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देत मुलींना त्रासा देत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. यावर प्रत्युत्तर देताना बृजभूषण सिंह यांनी हे आरोप खरे ठरले तर फासावर जाईन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता हे प्रकरण केंद्र सरकारकडेही (Case In Central Government) गेलंय. क्रिडा मंत्रालयानं कुस्ती महासंघाला याबाबत ७२ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. बृजभूषण सिंह यांच्या समर्थनार्थही काही खेळाडू पुढे सरसावल्याचं दिसतंय.तर दुसरीकडे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचे म्हटले आहे. याबद्दल ते आज 12 वाजता पत्रकार परिषदेत घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहेत.