
एक्सने 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये 5,59,439 अकाउंट्सवर बंदी घातली आहे.
एक्सचे (पूर्वीचे ट्विटर) प्रमुख एलॉन मस्क आहे. एक्स कंपनीने IT 2021 च्या नियमाचे पालन करून 5,57,764 भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. एक्सने ही कारवाई 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत केली आहे. याबद्दलची माहिती कंपनीने दिली आहे. बंदी घालण्यात आलेल्या अकाउंट्समध्ये बालकांचे लैंगिक शोषण आणि भावना भडकवणाऱ्या साहित्याचा (पॉर्न) परवानगीविना प्रसार करणाऱ्या एक्स अकाउंट्सचा समावेश आहे.
एलॉन मस्क यांनी आता एक्स (पूर्वीचे ट्विटर) चे सीईओ पद सोडले होते. आता लिंडा याकारिनो या एक्सच्या सीईओ आहेत. तसेच मास्क यांनी कंपनीचा लोगो देखील बदलला आहे. या मायक्रो ब्लॉगिंफ प्लॅटफॉर्म असणाऱ्या एक्सने दशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल 1,675 अकाउंट्सवर बंदी घातली आहे.
एक्सने26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये 5,59,439 अकाउंट्सवर बंदी घातली आहे. एक्सने नवीन आयटी नियम 2021 चे पालन करत आपल्या मासिक अहवालामध्ये म्हटले आहे की, भारतातील युजर्सकडून कंपनीला एकूण 3,076 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच वापरकर्त्यांना 116 अकाउंट्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आम्ही सगळी तपासणी केल्यानंतर 116 पैकी 10 अकाउंटवरील बंदी उठवली असून उर्वरित अकाउंटवरील बंदी कायम ठेवली आहे.
कंपनीने सांगितलं की, एक्स अकाउंटशी संबंधित प्रश्नांच्या 13 रिक्वेस्ट प्राप्त झाल्या. यात भारतात प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये अत्याचार/छळ (1,076), द्वेषपूर्ण वर्तन (1,063) आणि बाल लैंगिक शोषण (450) व संवेदनशील कंटेंट (332) चा समावेश होता. तसेच एक्स कंपनीने 26 जुलै ते 25 ऑगस्ट दरम्यान 12,80,107 अकाउंट्सवर बंदी घातली होती.