शाहरुख खानला  वाय प्लस सुरक्षा! पुन्हा धमक्या मिळाल्यानं किंग खानच्या सुरक्षेत वाढ, नेमकं प्रकरण काय?

शाहरुख खानला मिळालेल्या धमकीनंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. आता त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान शाहरुखला धमक्याही आल्या होत्या.

    शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जवान (Jawan) चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला असून अदयापही चित्रपटाची क्रेझ सुरुच आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी त्याचा चित्रपटाला पंसती दर्शवली आहे. आधी त्याच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आणि नंतर जवान. जवान हा चित्रपट अजूनही कमाई करत आहे. यादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानच्या सुरक्षेत पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. किंग खानला मिळालेल्या धमक्यांनंतर (Shahrukh Khan Y Plus Security) त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शाहरुखला अलीकडेच काही धमक्या आल्या होत्या, त्यामुळे त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

    यापुर्वीही शाहरुख खानला मिळाली धमकी

    शहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट याच वर्षी जानेवारीमध्ये रिलीज झाला होता. यावेळी त्याला धमक्या आल्या आणि मुंबई पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली होती. किंग खानला पुन्हा एकदा धमक्या आल्याचे वृत्त आहे, मात्र मुंबई पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. याबाबत अधिकृतपणे काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्याचवेळी, सूत्रांवर विश्वास ठेवला तर, महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाने नुकतीच याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर शाहरुख खानला वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. वाय प्लस सिक्युरिटी अंतर्गत शाहरुखला 11 वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी मिळतील, ज्यात 6 कमांडो, 4 पोलीस आणि 1 ट्रॅफिक क्लिअरिंग वाहन असेल. यासोबतच शाहरुखच्या मन्नत या बंगल्यातही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

    शाहरुख खानचा आगामी चित्रपट डंकी

    या वर्षी बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा दबदबा आहे. त्यांच्या पठाण आणि जवानांनी प्रचंड नफा कमावला. आता त्याचा डिंकी हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात राजकुमार हिरानीसोबत तापसी पन्नू मुख्य अभिनेत्री आहे. हा चित्रपट 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.