यवतमाळ जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवले जीवन

    यवतमाळ : नेर तालुक्यातील मालखेड बुद्रुक येथील शेतकरी प्रकाश उत्तम मानकर (वय ५४) यांनी आपले भाऊ पुरुषोत्तम मानकर यांच्या शेतामध्ये आज दिनांक २० मार्च रोजी सकाळी ७ च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

    दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सदर शेतामध्ये धाव घेतली तथा स्थानिक पोलीस पाटील यांनी नेर पोलीस स्टेशनला या बाबत माहिती दिली. सदर मृतक शेतकरी यांचे शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.

    आत्महत्येचं कारण काय? 

    मृतक शेतकरी यांच्याकडे १० एकर शेती असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उत्तर वाढोना येथील बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती नागरिकांनी दिली. सतत नापिकी तथा कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केली असे स्थानिकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी असा आप्त परिवार आहे.