तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण; लाल किताब मधला ‘हा’ तोटका आहे चमत्कारिक!

३६ लवंगा व त्यात ६ कापराच्या वड्या घेऊन त्यात हळद व तांदूळ मिक्स करून आपण दुर्गा देवीला आहुती द्यावी म्हणजे दुर्गामंत्राचा जप करत आगीमध्ये थोडे थोडे मिश्रण टाकावे यामुळे विवाह मध्ये येणारे सर्व दोष दूर होतात.

  आपण देवाची आरती करताना कापूर जाळतो. त्याच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न देखील राहते, अश्या ह्या कापराचे अनेक फायदे देखील आहेत आपल्या वास्तुशास्त्रात व ज्योतिषशास्त्रात आणि लाल किताबीमध्ये याचे अनेक उपयोग देखील सांगितले आहेत. आजच्या आपल्या लेखात आपण कापराचे काही उपाय सांगणार आहोत जे केल्याने तुमच्या सर्व धनसंबंधी समस्या दूर होतील. त्याबरॊबरच तुम्ही तुमच्या घरावरील बाधा दोष यांपासून  सुटका होईल.

  जर आपल्या घरात काही वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी आपण दोन कापराच्या वड्या ठेवून द्याव्यात व त्या संपल्या की परत आपण तिथे ठेवाव्यात असे केल्याने आपली वास्तुदोषापासून सुटका होईल. कापूर जाळल्याने देवदोष किंवा पितृदोष दूर होतो. काही लोकांना पितृदोष, कालसर्पदोष असतात तर हे खरेतर राहू केतू ह्यांचा प्रभाव असतो. हा प्रभाव दूर करण्यासाठी आपण सकाळी व संध्यकाळी तुपात भिजवलेला कापूर आपण जाळाव्यात.

  आपल्या घरातील टॉयलेटमध्ये देखील आपण २ कापराच्या वड्या ठेवून द्याव्यात यामुळेदेखील राहुदोष दूर होतो. एक गुलाबाचे फुल घेऊन त्यात कापूर जाळावा व हे फुल आपण माता लक्ष्मीला अर्पण करावे ह्यामुळे आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते. पण हा उपाय आपण नवरात्रात केला तर आणखी जास्त लवकर आपल्याला त्याचा फरक दिसेल.

  रात्री जेवण झाल्यानंतर आपण सर्व किचन साफ करावे व एका चांदीच्या वाटीत २ कापराच्या वड्या व लवंग ठेवून जाळावे हे आपण नित्यनियमाने केल्यास धनधान्याने तुमचे घर नेहमी भरलेले राहील आणि तुम्हाला धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही. जर तुमच्या विवाहाची बोलणी सुरु असतील आणि काही ना काही अडचणी निर्माण होत असतील तर हा उपाय आपण नक्की करा फायदा होईल.

  ३६ लवंगा व त्यात ६ कापराच्या वड्या घेऊन त्यात हळद व तांदूळ मिक्स करून आपण दुर्गा देवीला आहुती द्यावी म्हणजे दुर्गामंत्राचा जप करत आगीमध्ये थोडे थोडे मिश्रण टाकावे यामुळे विवाह मध्ये येणारे सर्व दोष दूर होतात. पतिपत्नींमध्ये पटत नसेल तर पतिने रात्री झोपताना पत्नीच्या उशीखाली एक कापराची वडी ठेवावी व पत्नीने पतीच्या उशीखाली एक कुंकवाची टिकली ठेवावी व सकाळी उठल्यानंतर ती एका झाडाखाली टाकून द्यावी, व कापूरच्या वड्या बेडरूम मध्येच जाळाव्यात असे केल्याने पतिपत्नीमधील भांडणे मिटतील तसेच ताणतणाव दूर होतील.

  सकाळी अंघोळ करताना कापूरच्या तेलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्याने संपूर्ण दिवसभर आपण उत्साही व फ्रेश राहाल. रोज संध्यकाळी दिवे लावण्याची वेळी आपण दररोज कापूर जाळल्याने आपल्या घरातील सर्व सूक्ष्म जीवजंतू मरून वातावरण प्रसन्न होते.