Young farmer commits suicide by making video clip in Akola

मुर्तिजापूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने स्वतःची व्हिडीओ क्लिप बनवत विष घेऊन आत्महत्या केली. प्रवीण बाबुलाल पोळकट रा. साखरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. माझे ट्रॅक्टर फायनान्स कंपनीने ओढून नेल्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे, असे आत्महत्येपूर्वी काढलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये या शेतक-याने म्हटले आहे(Young farmer commits suicide by making video clip in Akola).

    अकोला : मुर्तिजापूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने स्वतःची व्हिडीओ क्लिप बनवत विष घेऊन आत्महत्या केली. प्रवीण बाबुलाल पोळकट रा. साखरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. माझे ट्रॅक्टर फायनान्स कंपनीने ओढून नेल्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे, असे आत्महत्येपूर्वी काढलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये या शेतक-याने म्हटले आहे(Young farmer commits suicide by making video clip in Akola).

    नापिकीमुळे कर्ज थकीत

    प्रवीण यांच्यावर को. ऑप बँक तसेच कोटक महिंद्राचे कर्ज होते. यावर्षी झालेल्या नापिकीमुळे कर्जाचे हप्ते ते भरू शकले नाहीत, म्हणून त्यांचा छोटा ट्रॅक्टर 18 नोव्हेंबर रोजी फायनान्स कंपनीने ओढून नेला. ट्रॅक्टर गमावल्याचा अपमान त्यांचा मनाला लागला. याच विवंचनेतून त्यांनी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्यांना अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. 19 नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

    व्हिडीओ व्हायरल

    आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात त्यांनी रोहन काळे व कोटक महिंद्राचा उल्लेख केला असून, माझ्या आत्महत्येस यांनाच जबाबदार धरण्यात यावे, असे म्हटले आहे. रोहन काळे व कोटक महिंद्राविरुद्ध कठोर कारवाईची मागणीदेखील केली आहे. प्रवीण त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली तसेच आई, वडील आहेत.