पत्नी, सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून जीवन संपविले

योगेश व सुचित्रा यांचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला होता. ते सातवनगर परिसरात राहण्यास होते. यादरम्यान, पत्नी व सासरे योगेश याचा मानसिक व शारिरीक छळ करत होते. या छळाला कंटाळून त्याने राहत्या घरी ओढणीने गळफास लावन आत्महत्या केली.

    पुणे : पत्नी आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
    योगेश रूपचंद धनवडे (वय ३२, रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी सुचित्रा योगेश धनवडे व सुचित्रा यांचे वडिल यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत योगेशची आई सुरेखा (वय ६५) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर रोजी घडला आहे.
    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा योगेश व सुचित्रा यांचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला होता. ते सातवनगर परिसरात राहण्यास होते. यादरम्यान, पत्नी व सासरे योगेश याचा मानसिक व शारिरीक छळ करत होते. या छळाला कंटाळून त्याने राहत्या घरी ओढणीने गळफास लावन आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद होती. त्यादरम्यान, तक्रारदार यांना योगेश याने आत्महत्या करण्यापुर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली. त्यात त्याने पत्नी व सासरे मानसिक त्रास देत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे, असे लिहीले होते. तसेच, ही सुसाईट नोट योगेश याने त्याच्या भावाला देखील पाठविली होती. त्यानुसार, याप्रकरणी गु्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी या करत आहेत.