झेडपी मुख्यालयाला सर्वाधिक पसंती ; पहिल्या टप्यात १२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर झेडपीच्या पहील्या टप्यात १२८ कर्मचाऱ्यांच्या सोमवारी दिवसभरात समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात आले आहेत. प्रशासकीय बदली १४, विनंती बदली १०६, आपसी बदली ०८ अशा एकुण १२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला.

    सोलापूर : सोलापूर झेडपीच्या पहील्या टप्यात १२८ कर्मचाऱ्यांच्या सोमवारी दिवसभरात समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात आले आहेत. प्रशासकीय बदली १४, विनंती बदली १०६, आपसी बदली ०८ अशा एकुण १२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. झेडपी मुख्यालयाची सर्वाधिक पसंती कर्मचाऱ्यांकडून दर्शविण्यात आली. सामान्य प्रशासन प्रमूख डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बदली प्रक्रिया करण्यात आली. बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून आली.

    ९ ते १२ मे पर्यंत समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात येणार आहेत. पंचायत समिती स्तरावर १२ मे रोजी बदल्या करण्यात येणार आहेत. सर्व विभाग प्रमुख आणि गट विकास अधिकारी यांना सामान्य प्रशासनाकडून बदली संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत प्रशासकीय, विनंती, आपसी बदल्या पार पडल्या. पहिल्या सत्रात सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी विनंती १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी विनंती १, वरिष्ठ सहाय्यक प्रशासकीय १, विनंती २, कनिष्ठ सहाय्यक, प्रशासकीय ६, विनंती २३, आपसी २, परिचर विनंती १७, आपसी २ बदल्यांचा समावेश अाहे.

    ग्रामपंचायत, अाराेग्य, िशक्षण
    दुसऱ्या टप्यात ग्रामपंचायत विभागातील विस्तारधिकारी प्रशासकीय १, विनंती २, ग्रामसेवक विनंती १७, प्रशासकीय १ ग्रामविकासधिकारी विनंती ८, तिसऱ्या टप्यात महिला व बाल कल्याण विभागातील सहाय्यक बालविकासधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका विनंती १ प्रशासकीय १, चौथ्या टप्यात प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तारधिकारी विनंती ३, प्रशासकीय २, केंद्रप्रमूख, आरोग्य विभागातील औषधनिर्माण अधिकारी विनंती ३, आपसी २, आरोग्य सहाय्यक विनंती ३, आरोग्य सहाय्यीका विनंती १, आरोग्य सेविका विनंती १८, आरोग्य सेवव विनंती २ बदल्यांचा समावेश अाहे.

     अर्थ, लेखा िवभाग
    अर्थ विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी प्रशासकीय १, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) प्रशासकीय १, आपसी २, कनिष्ठ सहायक (लेखा), कृषि विभागातील कृषि विस्तार अधिकारी प्रशासकीय २, विनंती १, कृषीधिकारी, आशा स्वरुपाच्या बदल्या पहिल्या टप्यात करण्यात आल्या आहेत. सीईओ दिलीप स्वामी यांच्या प्रमूख उपस्थितीत बदल्या होणार आहेत.