ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट16 दिन पहले

अग्नीपरिक्षा : बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत सत्तापालट, केरळात डावे तर आसामात भाजपची बाजी

ऑटो अपडेट
द्वारा- Vanita Kamble
कंटेन्ट रायटर
16:42 PMMay 02, 2021

नंदीग्राममध्ये अखेर ममता बॅनर्जी विजयी

नंदीग्राममधून सकाळपासून पिछाडीवर असणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेरच्या टप्प्यांमध्ये आघाडी घेत शेवटी विजय संपादित केलाय. 

15:50 PMMay 02, 2021

Video - या क्षणाचे अपडेट्स

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाचं काय आहे या क्षणाचं चित्र? ताजे अपडेट्स सांगणारा व्हिडिओ.

15:05 PMMay 02, 2021

निवडणूक रणनितीचे काम थांबवणार, प्रशांत किशोर यांची धक्कादायक घोषणा

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे निवडणूक रणनीतीकार आणि तमिळनाडूमधील डीएमके नेते एम.के. स्टॅलिन यांचे सल्लगार प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतीचे काम थांबवत असल्याची घोषणा केलीय. आपली कंपनी काम करत राहिल, मात्र आपण यापुढे हे काम करणार नाही, असं त्यांनी एका इंग्रजी वृत्ताहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. 

बंगात्लमध्ये भाजपला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर आपण काम थांबवू, अशी घोषणा त्यांनी केली होती. आता भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळत आहेत. तरीही आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

14:11 PMMay 02, 2021

तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष

विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर जल्लोष करताना तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते भाजप कार्यालयाबाहेर गोळा झाले आणि त्यांनी जोरदार जल्लोष केला. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं.

13:57 PMMay 02, 2021

बंगालमध्ये पुन्हा भाजप शंभरीकडे

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजप उसळी घेताना दिसत असून ९० जागांच्या खाली आलेल्या भाजपनं पुन्हा ९६ जागांपर्यंत आघाडी घेतलीय. उरलेल्या फेऱ्यांमध्ये चमत्कार होईल, असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय.

13:46 PMMay 02, 2021

सेलिब्रेशन थांबवा, पोलिसांच्या तृणमूल कार्यकर्त्यांना सूचना

पश्चिम बंगालमध्ये विजय दृष्टीपथात आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. मात्र कोरोनाचे वाढते आकडे लक्षात घेता कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी न करता आपापल्या घरी थांबावं, अशा सूचना पोलिसांनी केल्यात.

13:25 PMMay 02, 2021

द्रमुक कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशनला सुरुवात

तमिळनाडूमध्ये द्रमुकला बहुमत मिळत असल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलीय. डीएमकेनं १३० जागांवर आघाडी घेतली असून बहुमतासाठीचा ११८ जागांचा आकडा ओलांडला आहे.

13:02 PMMay 02, 2021

तृणमूलनं ओलांडला २०० चा आकडा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं २०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतलीय. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलीय.

12:17 PMMay 02, 2021

केरळमध्ये मेट्रो मॅन ई श्रीधरन ६००१ मतांनी आघाडीवर

केरळमध्ये मेट्रो मॅन ई श्रीधरन ६००१ मतांनी आघाडीवर. तर एकूण कलात LDF निर्णायक आघाडीच्या दिशेने जात असल्याचं चित्र आहे. 

12:14 PMMay 02, 2021

VIDEO - आतापर्यंतच्या निकालाचे अपडेट्स

४ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे निकाल जाहीर होतायत. पाहा, या क्षणाचे अपडेट्स.

Load More

चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या निकालांचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. सर्वांचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली हॅटट्रिक करायला तृणमूल सज्ज झाल्याचं चित्र दिसतंय. तमिळनाडूमध्ये सत्तापालट होण्याची चिन्हं स्पष्ट दिसत असून द्रमुकच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याचे संकेत मिळत आहेत. आसाममध्ये भाजपनं मुसंडी मारली असून केरळचा गड LDF नं पुन्हा एकदा काबीज केलाय. तर पुदुच्चेरीमध्ये भाजपची सत्तेकडं वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
१८ मंगळवार
मंगळवार, मे १८, २०२१

तिन्ही कृषी कायदे रद्द करा ही शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्याने भाजपला भविष्यात याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.