ASSEMBLY ELECTIONS 2021 - Kerala, Tamil Nadu, Assam, West Bengal, Puducherry Assembly election result

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला जनतेने नाकारले असून त्यांना कोरोनाच्या भाषेत बोलायचे तर येथे सत्ता मिळविण्यासाठी हवा तेवढा मतांचा ऑक्सिजन (उमेदवार) मिळाला नाही. पाच राज्याचे कल पाहता केवळ आसाममध्ये भाजप पुढे आहे. त्यामुळे एकूण पाच राज्यापैकी चार राज्यात भाजप व्हेंटिलेटरवर असल्याचे समोर आले आहे.

  पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असून २०० च्या पुढे जागा मिळवत मोठ्या विजयाची शक्यता आहे. भाजपाला मात्र ८३ जागांवरच विजय मिळत असल्याचं चित्र आहे. निवडणूक आयोगाने ही आकडेवारी दिलीय. दीदी, ओ दीदी… तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना केलेला मात्र याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. कोरोना संकटा दरम्यान, जेव्हा मोदी सरकारवर देशभर टीका होत झालेली, अगदी भाजप समर्थकदेखील सरकार आणि पक्ष नेतृत्वावर भडकले होते. मात्र अशा परिस्थितीही भाजपने प्रचार जोरदार सुरु ठेवलेला. याचाच परिणाम म्हणा पण पश्चिम बंगालमध्ये भाजपाला जनतेने नाकारले असून  कोरोनाच्या भाषेत बोलायचे तर येथे त्यांना सत्ता मिळविण्यासाठी हवा तेवढा मतांचा ऑक्सिजन  मिळाला नाही. पाच राज्याचे कल पाहता केवळ आसाममध्ये भाजप पुढे आहे. त्यामुळे एकूण पाच राज्यापैकी चार राज्यात भाजप व्हेंटिलेटरवर असल्याचे समोर आले आहे.

  कोरोनाच्या लाटेत मोदी लाट विरली

  देशात कोरोनाचा उद्रेक झालेला मात्र पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली घेत होते. त्यांच्या रँलीना लोकांची गर्दी झाल्यामुळे मोदी लाटेचा प्रत्यय पुन्हा आला. मात्र आज निकालातून कोरोनाच्या लाटीपुढे मोदींची आणि भाजपाची लाट ओसरल्याचे चित्र आहे. या निकालांचा मोदींच्या नेतृत्वावर काही परिणाम होईल का? यावर, राजकीय विश्लेषक एस अनिल म्हणतात की, “मोदी आणि भाजपाने बंगालमध्ये आपली सर्व शक्ती लावली होती. त्यातून भाजपही जिंकत असल्याचे वातावरण निर्माण झाले. असे असूनही, टीएमसीचा विजय हा भाजप आणि मोदींना मोठा धक्का आहे. दीदी ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये हरल्या तर भाजपाला आनंदी राहण्याची संधी मिळू शकेल. भाजपच्या या पराभवामागील बरीच कारणे आहेत, त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे अतिआत्मविश्वास !”.

  ईशान्य भारतातील बंगाल सर्वात मोठे राज्य आहे. विधानसभा जागांच्या बाबतीतही यूपीनंतरची सर्वाधिक २९४ जागा येथे आहेत. अशा परिस्थितीत देशातील दुसर्‍या क्रमांकाचे राजकीय राज्य जिंकणे हे मोदी आणि भाजपाचे स्वप्न साकार करण्यासारखे होते. यातून पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये यूपी, उत्तराखंड आणि पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत दुहेरी मनोबल वाढवण्याचा भाजपचा मार्ग होता. परंतु बंगालमधील पराभवानंतर या राज्यांमधील भाजपला आता लसची गरज भासणार आहे.

  आता भाजपचे पुढचे लक्ष्य उत्तर प्रदेश
  पुढील वर्षी देशातील सर्वात मोठे राजकीय राज्य असलेल्या यूपीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१७ मध्ये येथे भाजपाने ३१२ जागा जिंकल्या. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोदींना पंतप्रधान बनविण्यात यूपीचेही मोठे योगदान आहे. २०१४ मध्ये एनडीए यूपीने ८० पैकी 73 जागा जिंकल्या. २०१९ मध्ये एनडीएने ६२ जागा जिंकल्या. अशा स्थितीत येथील आगामी विधानसभा निवडणुका मोदी आणि भाजपाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्वत: मोदी देखील यूपीचे खासदार आहेत, त्यामुळे यूपीमध्ये भाजपाच्या सर्व गोष्टी पणाला लागतील.

  उत्तराखंडचा गड राखणे भाजपासमोरचे आव्हान
  देवभूमी उत्तराखंडमध्ये भाजपासाठी सर्व काही आलबेल असे नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाने येथे ७० पैकी ५७ जागा जिंकल्या होत्या. असे असूनही, आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाला मुख्यमंत्रिपदी बदलणे आवश्यक आहे. त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या जागी तिरथसिंग रावत यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता हे पाहावे लागेल की नवीन मुख्यमंत्री पुन्हा भाजपाला सत्तेत आणू शकतील काय? २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपने राज्यातील सर्व ५ जागा जिंकल्या. येथे देखील मार्च २०२२ मध्ये मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत उत्तराखंडचा गड राखणे मोदी आणि भाजपसाठी मोठे आव्हान आहे.

  भाजपाला पंजाब जिंकणे सोपे नाही
  पंजाबमध्येही यूपी आणि उत्तराखंडसह पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. येथे भाजपने नेहमीच अकाली दलाशी युती केली आहे. इथल्या शेतकरी आंदोलनामुळे आता अकाली दल भाजपपासून वेगळा झाला आहे. अशा परिस्थितीत येथे जागा जिंकणे भाजपाला अजिबात सोपे नाही. राज्यात भाजपचा चेहरादेखील नाही. अशा परिस्थितीत भाजप येथे मोदींचा चेहरा घेऊन मैदानात उतरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.