ASSEMBLY ELECTIONS 2021 - Kerala, Tamil Nadu, Assam, West Bengal, Puducherry Assembly election result

 प्रशांत किशोर (prashant kishor)यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात (west bengal electon) भाष्य केले. यावेळी त्यांनी  भाजपला बंगालमध्ये १०० जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले.

    कोलकाता:राजकीय तज्ञ प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी (West Bengal Election 2021) ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस(trunmul congress) पक्षासाठी काम केले होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी एक मुलाखत दिलेली होती. त्यात त्यांनी भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळतील असा दावा केला होता. प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी आता खरी होण्याची चिन्हे दिसत आहेत.


    प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी  भाजपला बंगालमध्ये १०० जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले. मात्र, भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली तर देशात भाजपचा एकाधिकारशाही निर्माण होईल, असा इशारा प्रशांत किशोर यांनी दिला होता.

    पश्चिम बंगालमध्ये थेट लढत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रसचे कितीही नेते पक्ष सोडून गेले असले तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसणार नाही, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला.