Sanjay Raut

पश्चिम बंगालच्या(West Bengal Election 2021) विजयाची मशाल संपूर्ण देशात एक नवा प्रकाश निर्माण करेल असे शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut Reaction) यांनी म्हटले आहे.

    पश्चिम बंगालच्या विजयाची मशाल संपूर्ण देशात एक नवा प्रकाश निर्माण करेल असे शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut Reaction) यांनी म्हटले आहे.

    एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्धवस्त केलं, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही, लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे.