पश्चिम बंगाल निवडणूक – ममता बॅनर्जींच्या विजयाची चिन्हे दिसताच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले …

संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar Reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत(West Bengal Election 2021) ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या विजयाची चिन्हे दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar Reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    “या विलक्षण विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात,” असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या आकेडवारीनुसार, तृणमूल काँग्रेस २०४ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८६ जागांवर आघाडीवर आहे.

    कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल.