पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल मोठ्या मनाने स्वीकार करा, रडीचा डाव खेळू नका – शरद पवारांनी व्यक्त केला संताप

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी आधी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र कालांतराने त्या हरल्याचे जाहीर करण्यात आले. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये(West Bengal Election 2021) तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे.

    भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. अद्याप निवडणुकीच्या अधिकृत निकालाची घोषणा झालेली नाही, मात्र ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे. मात्र पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी आधी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र कालांतराने त्या हरल्याचे जाहीर करण्यात आले. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    west bengal election seats

    शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल.”