ऐतिहासिक विधानसभा निवडणुकींच्या मतमोजमीला सुरुवात, पोस्टल मतमोजणी सुरु, उ. प्रदेश, पंजाब, गोव्याकडे सगळ्यांचे लक्ष

देशातील प्रतिक्षित पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे.

    नवी दिल्ली : देशातील प्रतिक्षित पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. थोड्या वेळातच त्याचे कल समोर येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.
    मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्तात ही मतमोजणी सुरु करण्यात आली आहे.