Dispute Over Goa CM Post! गोव्यात मुख्यमंत्रिपदावरून पेच! भाजप पक्षातील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास विलंब; प्रमोद सावंत यांचा पत्ता कट
गोव्यात विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा मिळवून भाजपाने अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेसाठी दावा केला असून अद्यापही मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. पक्षातील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास उशिर होत असल्याचे सूत्राने सांगितले तथापि, याबाबतचे वृत्त गोवा भाजपाने फेटाळून लावले आहे. गोवा विधानसभेची मुदत 16 मार्च रोजी संपत आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने रोष टाळण्यासाठी प्रमोद सावंत यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे(Dispute over Goa CM post! Delay in announcing CM's name due to internal dispute within BJP party; Cut the address of Pramod Sawant).