उत्तरप्रदेशात 80% नेत्यांचे डिपॉझिट जप्त; काँग्रेस प्रथम क्रमांकावर

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला तर भाजपाने चार राज्यात ऐतिहासिक विजय मिळविला. दरम्यान या नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने लढवलेल्या 399 जागांपैकी 387 जागांवर आपली अनामत रक्कम देखील गमावली आहे. पक्षाला फक्त दोन जागा मिळवता आल्या(80% of leaders' deposits confiscated in Uttar Pradesh; Congress at number one).

    लखनौ : देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला तर भाजपाने चार राज्यात ऐतिहासिक विजय मिळविला. दरम्यान या नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने लढवलेल्या 399 जागांपैकी 387 जागांवर आपली अनामत रक्कम देखील गमावली आहे. पक्षाला फक्त दोन जागा मिळवता आल्या(80% of leaders’ deposits confiscated in Uttar Pradesh; Congress at number one).

    जवळपास सर्व जागा लढवून काँग्रेसला राज्यातील एकूण मतांपैकी फक्त 2.4% मते मिळाली, जी रालोदने 33 जागा लढवूण मिळवलेल्या 2.9% मतांपेक्षा देखील कमी आहेत. इतर प्रमुख पक्षांपैकी, बसपाने सर्व 403 जागा लढवून 290 जागांवर डिपॉझिट गमावले. अगदी मोठा विजय मिळवलेल्या भाजपाने देखील 376 जागांपैकी तीन जागांवर त्यांचे डिपॉझिट गमावले.

    विशेष म्हणजे, भाजपाचे सहकारी पक्ष अपना दल (सोनीलाल) आणि निषाद यांनी आपापसात लढवलेल्या 27 जागांपैकी एकाही जागेवर त्यांची अनामत रक्कम गमावली नाही, यामुळे त्यांना लढण्यासाठी ज्यात त्यांची जिंकण्याची शक्यता होती फक्त त्याच जागा देण्यात आल्या असल्याचे दिसून येते. याउलट, सपाचे जोडीदार सुभासपा आणि अपना दल (कामेरवाडी) यांनी त्यांच्या एकत्रित 25 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांचे डिपॉझिट गमावले आहे.

    अगदी ज्येष्ठ मित्रपक्ष रालोदने लढवलेल्या 33 जागांपैकी तीन जागांवर आपले डिपॉझिट गमावले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 16.6% टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. यूपीमधील 4,442 उमेदवारांपेकी 3,522 किंवा जवळपास ८०% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

    मायावतींचा माध्यमांवर जातीयवादाचा आरोप

    दारूण पराभवानंतर मायावतींनी आता मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी त्यांनी ट्विट करून बसपाचे सर्व प्रवक्ते यापुढे कोणत्याही टीव्ही चर्चेत भाग घेणार नसल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमांवर जातीयवादी वृत्तीचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान, मीडियाने जातीय द्वेष निर्माण करीत बसपा चळवळीला नुकसान पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया, धरमवीर चौधरी, डॉ. एम. एच. खान, फैजान खान आणि सीमा कुशवाह हे यापुढे टीव्हीवरील वादविवादात भाग घेणार नाहीत. निकाल हा बसपाच्या अपेक्षेविरुद्ध आहे. त्याऐवजी, आपण त्यातून शिकले पाहिजे, आत्मपरीक्षण करून आपल्या पक्षाची चळवळ पुढे नेली पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.