पंजाबमध्ये ‘सिंग इज किंग’

जोकर निवडणूक कशी जिंकेल आणि मुख्यमंत्री होईल का? जोकर मुख्यमंत्री झाला तर पंजाबचे काही खरे नाही, अशी खिल्ली निवडणूक प्रचारात उडवलेल्या नेत्यांना भगवंत मान आता मुख्यमंत्री होणार आहेत, यातून उत्तर मिळाले आहे(Aam Aadmi Party wins in Punjab).

  जोकर निवडणूक कशी जिंकेल आणि मुख्यमंत्री होईल का? जोकर मुख्यमंत्री झाला तर पंजाबचे काही खरे नाही, अशी खिल्ली निवडणूक प्रचारात उडवलेल्या नेत्यांना भगवंत मान आता मुख्यमंत्री होणार आहेत, यातून उत्तर मिळाले आहे(Aam Aadmi Party wins in Punjab).

  दिल्लीनंतर आता आम आदमी पक्षाचे सरकार आणखी एका राज्यात येणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांना मागे टाकत बाजी मारली. निवडणुकीच्या आधी आपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून खासदार भगवंत सिंह मान यांच्या नावाची घोषणा केली होती. आता लवकरच ते राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतील.

  कोण आहेत भगवंत मान?

  – भगवंत मान यांना लोक कॉमेडियन आणि नेते म्हणून ओळखतात.
  – पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा ते आम आदमी पार्टीचे खासदार बनले आहेत. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत.
  – 17 ऑक्टोबर 1973 रोजी पंजाबमधील सतोज जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला.
  – लाफ्टर क्वीन भारती सिंह, विनोदवीर कपिल शर्मा या कलाकरांना प्रसिद्धी मिळालेल्या ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही शोच्या पहिल्या सीझनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मान हे एक व्यंगचित्रकार देखील आहेत.
  – 2011मध्ये मनप्रित बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब या पक्षातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
  – संगरुरमधील लेहरगा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले. नंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
  – 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संगरुर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
  – आम आदमी पक्षाचे संसदेत निवडून आलेले आणि पक्षाचे सभागृहात नेतृत्व करणारे ते एकमेव खासदार आहेत. युवक तसेच ग्रामीण भागात मान हे लोकप्रिय आहेत.
  – 48 वर्षीय मान यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते परदेशात राहतात. मुलांशी देखील मान यांचा फारसा संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे.