goa assembly elction

भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. गोवा (Goa) राज्यामध्ये भाजपच्या सरकारचा १४ मार्च रोजी शपथविधी (Oath Taking Ceremony By BJP) होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

    पणजी: देशातील सगळ्यात छोटे राज्य असलेल्या गोवा (Goa) राज्यामध्ये सांक्वेलिम मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant’s Victory For The Third Time) तिसऱ्यांदा जिंकले आहेत. विजय मिळाल्यानंतर सावंत यांनी सांगितलं की, भाजप २० जागांवर (BJP Leading on 20 Seats) जिंकत आहे. आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीसोबत (MGP) सरकार स्थापन करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. गोवा (Goa) राज्यामध्ये भाजपच्या सरकारचा १४ मार्च रोजी शपथविधी (Oath Taking Ceremony By BJP) होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

    गोव्यात भाजपाने सत्तेची हॅट्रिक केली हे. २०१२, २०१७ साली भाजपाने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते. आता पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांच्याविना भाजपा गोव्यात सरकार स्थापन करणार आहे. एकेकाळी पर्रिकरांशिवाय भाजपाचे गोव्यात अस्तिव नाही हे सांगण्यात येत होते, त्यावरुन आता पर्रिकर पुत्राशिवायही सत्तास्थापनेचा मार्ग भाजपाला सापडलेला आहे.

    ममता-केजरीवाल यांच्यामुळे भाजपाला लाभ
    ममताने एमजीपीसह निवडणुका लढवल्या. तर केजरीवाल यांनी ४० पैकी ३९ जागी उमेदवार दिले होते. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसची मते खाल्ली. त्याचा फायदा भाजपाला झाला. भाजपाविरोधी असलेली मते विरोधकांत वाटली गेली. ही मते एकवटली असती तर त्याचा तोटा भाजपाला झाला असता. पण तसे झाले नाही.