goa assembly elction

गोव्यामध्ये (Goa) भाजप १९ जागांवर आघाडीवर (BJP Leading On 19 Seats At Goa) आहे. पणजी मतदारसंघामध्ये गोव्याचे (Goa Assembly Election Result 2022) माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

    देशातील सगळ्यात छोटं राज्य असलेल्या गोव्यामध्ये (Goa ) भाजपचे सरकार (BJP) येण्याची चिन्ह दिसत आहेत. न्यूज एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीचे नेता आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लईंना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. (Goa Assembly Election Result 2022) सूत्रांच्या मते, भाजप ३ अपक्ष उमेदवारांचं समर्थन घेणार असून त्यासंदर्भात बोलणी झाली आहे.

    गोव्यामध्ये भाजप १९ जागांवर आघाडीवर आहे. पणजी मतदारसंघामध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पणजी मतदारसंघातून ८०० मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे अतानिसोयो मोन्सरात उर्फ बाबुश मोन्सरात विजयी झाले आहेत. (Utpal Parrikar Losses Goa Election 2022) गोव्यामध्ये काँग्रेस १२, एमजीपी + ३ आणि आप २ जागांवर आघाडीवर आहे. अन्य उमेदवार ४ जागांवर आघाडीवर आहे.