temple run

पाच राज्यांच्या (Assembly Election Results 2022) निवडणुकांच्या निकालाकडे (Results) आज सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशातच पाचही राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांच्या निकालाला तर विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच निवडणुकीत विजय मिळावा म्हणून या उमेदवारांनी (Cm Candidates In Temple) देवाकडे प्रार्थना केल्याचे दिसते.

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Results 2022) आज जाहीर होत आहेत. हे निकाल जाहीर होण्याआधी अनेक उमेदवारांनी देवाचं दर्शन घेतलं.पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन विजयासाठी प्रार्थना केली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditya nath) मतमोजणी सुरु होण्याआधी मंदिरात जाऊन प्रार्थना करुन आले. मणिपूरचे सीएम विरेन सिंह  (Viran singh) हे प्रवत्का संबित पात्रा यांच्यासह श्री गोविदं मंदिरात गेल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्यांनी तिथे पूजाही केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawnat)यांनी दत्त मंदिरामध्ये जाऊन विजयासाठी देवाला साकडे घातले.

    पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे आज सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशातच पाचही राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांच्या निकालाला तर विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच निवडणुकीत विजय मिळावा म्हणून या उमेदवारांनी देवाकडे प्रार्थना केल्याचे दिसते.