
गोव्यातील विजयावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reaction On Victory In Goa Election) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्यातल्या लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं आहे. आम्हाला २० किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
देशातील सगळ्यात छोटे राज्य असलेल्या गोवा (Goa) राज्यामध्ये सांकेलिम मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant’s Victory For The Third Time) तिसऱ्यांदा जिंकले आहेत. भाजप २० जागांवर (BJP Leading on 20 Seats) जिंकत आहे. भाजप महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीसोबत (MGP) सरकार स्थापन करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. भाजपने गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर दिली होती. गोव्यातील विजयावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reaction On Victory In Goa Election) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Celebrations at BJP office in Panaji following official EC trends for #GoaElections2022
As per the latest trends, BJP has won 5 and is leading on 15 so far. pic.twitter.com/JK27eRuhla
— ANI (@ANI) March 10, 2022
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्यातल्या लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं आहे. आम्हाला २० किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अपक्ष उमेदवार आमच्यासोबत येणार आहेत. एमजीपी आमच्यासोबत युती करायला तयार आहे. आम्ही सरकार स्थापन करु . उत्पल पर्रिकरांच्या विरोधात उभे राहणारे बाबुश मोन्सरात जिंकणार हे पहिल्या दिवसापासून माहिती होतं, असंही त्यांनी नमूद केलं.
People of Goa have given us a clear majority. We will get 20 seats or even 1-2 seats more. People have shown faith in PM Modi. Independent candidates are coming with us. MGP is also coming with us and taking all together, we will form our govt: BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/s1lvXrL6Zv
— ANI (@ANI) March 10, 2022
गोव्यातील विजयामुळे भाजपचा विजय दुणावला आहेत. तसेच भाजपचे गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास वाढला आहे. गोव्यातील शिवसेनेच्या कामगिरीबद्दल विचारल्यावर फडणवीस म्हणाले की, शिवसेनेची लढत आमच्याससोबत नव्हती. ती नोटासोबत होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत, असंही ते म्हणाले.
गोव्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार २०२४ मध्ये निवडून येईल, त्याआधी जर आत्ताचं सरकार पडलं तर भाजप महाराष्ट्रातही सत्ता स्थापन करेल, असं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.