goa assembly

गोव्यात विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा मिळवून भाजपाने अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेसाठी दावा केला असून अद्यापही मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. पक्षातील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास उशिर होत असल्याचे सूत्राने सांगितले तथापि, याबाबतचे वृत्त गोवा भाजपाने फेटाळून लावले आहे. गोवा विधानसभेची मुदत 16 मार्च रोजी संपत आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने रोष टाळण्यासाठी प्रमोद सावंत यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे(Dispute over Goa CM post! Delay in announcing CM's name due to internal dispute within BJP party; Cut the address of Pramod Sawant).

    पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा मिळवून भाजपाने अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेसाठी दावा केला असून अद्यापही मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. पक्षातील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास उशिर होत असल्याचे सूत्राने सांगितले तथापि, याबाबतचे वृत्त गोवा भाजपाने फेटाळून लावले आहे. गोवा विधानसभेची मुदत 16 मार्च रोजी संपत आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने रोष टाळण्यासाठी प्रमोद सावंत यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे(Dispute over Goa CM post! Delay in announcing CM’s name due to internal dispute within BJP party; Cut the address of Pramod Sawant).

    दरम्यान, भाजप आमदारांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानुसार मंगळवारी शपथविधी होणार आहे. पण, आमदार विश्वजीत राणे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले असून त्यांनीदेखील शनिवारी राज्यपालांची भेट घेतली. तर सावंत यांनी आमदारांसोबत बैठक घेऊन व्यूहरचना आखल्याचे समजते.

    गोव्यात मुख्यमंत्र्यांबाबत अजूनही संभ्रम आहे. भाजप नेते विश्वजित राणे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे मानले जात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रमोद सावंत यांना त्यांची जागा अत्यंत कमी मतांनी जिंकता आली आहे. अशा स्थितीत यावेळी राज्याची सूत्रे कोण हाती घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपला समविचारी पक्षांची गरज आहे. त्यातच मगो हा भाजपचा पारंपरिक मित्रही आहे. याच मगोच्या मदतीने भाजपाला आगामी लोकसभा निवडणूक राज्यात जिंकायची आहे. त्यामुळे भाजपाकडे तूर्तास पुरेसे संख्याबळ असताना देखील त्यांना सत्तेत सहभागी करून घ्यायचा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा मानस आहे. मात्र याला राज्यातील काही आमदारांनी विरोध दर्शविला आहे.

    नवनिर्वाचित आमदार गणेश गावकर यांनी राज्यपालांच्या हस्ते राजभवनात हंगामी सभापती म्हणून शपथ दिली. गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी नवीन आमदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी 15 मार्च रोजी राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे.