vishwjeet rane and divya rane

गोव्यात (Goa Assembly Election Results 2022) भाजपचे उमेदवार विश्वजित राणे (Vishwjeet Rane) आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे (Divya Rane) या दोघांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राणे दाम्पत्याचा गोव्यात चांगलाच बोलबाला असल्याचं दिसत आहे.

    पणजी : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (Election Result 2022) आज समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेले निकाल आणि कलांनुसार भाजपचा चार राज्यांमध्ये चांगलाच बोलबाला दिसतोय. सध्या पूर्णपणे निकाल समोर आला नसला तरी विजयी उमेदवारांची नावे आता जाहीर होऊ लागली आहेत. या दरम्यान गोव्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गोव्यात भाजपचे उमेदवार विश्वजित राणे (Vishwjeet Rane) आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे (Divya Rane) या दोघांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राणे दाम्पत्याचा गोव्यात चांगलाच बोलबाला असल्याचं दिसत आहे.

    विश्वजित राणे हे तब्बल ८३०० मतांनी जिंकून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी दिव्या या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या होत्या. तरीही त्यांना विजय मिळाला आहे. विश्वजित राणे यांना वाळपई मतदारसंघातून विजय मिळाला आहे. तर त्यांच्या पत्नी दिव्या यांना पर्रेमधून विजय मिळाला आहे. दिव्या ज्या मतदारसंघातून जिंकून आल्या आहेत तो मतदारसंघ खरंतर त्यांचे सासरे प्रतापसिंह राणे यांचा आहे. प्रतापसिंह हे गोव्यातील खूप बडे नेते आहेत. त्यांनी तब्बल ६ वेळा गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.