goa assembly elction

चौथ्या फेरीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) ६०५ मतांनी आघाडीवर आहेत. (Goa Assembly Election Result 2022) शिवोलीत दयानंद मांद्रेकर, मडगावात दिगंबर कामत पुढे आहेत. अशातच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मतांमध्ये पिछेहाट होत असल्याचे दिसताच मतमोजणी केंद्रावरुन निघून गेल्याची माहिती मिळाली आहेत.

    पणजी: सध्याच्या घडीला गोव्यामध्ये (Goa) काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. (Goa Assembly Election Results 2022) ४० जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २२ जागा आवश्यक आहेत. परंतु, सध्या काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आळीपाळीने आघाडी घेताना दिसत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे.भाजप १६ जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. आप एका जागेवर आघाडीवर आहे. इतर पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत.

    दरम्यान चौथ्या फेरीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ६०५ मतांनी आघाडीवर आहेत. शिवोलीत दयानंद मांद्रेकर, मडगावात दिगंबर कामत पुढे आहेत. अशातच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मतांमध्ये पिछेहाट होत असल्याचे दिसताच मतमोजणी केंद्रावरुन निघून गेल्याची माहिती मिळाली आहेत. केपेत आतापर्यंत काँग्रेसचे एल्टॉन डिकॉस्ता आघाडीवर आहेत. दरम्यान उत्पल पर्रिकर हे हरण्याची चिन्हे दिसत असल्याने मतमोजणी केंद्रावरून निघून गेल्याचे समजते.