गोव्याच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू; काँग्रेसची मुसंडी, 20 जागांवर आघाडी, भाजप 16 जागांवर पुढे

सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना एक-एक जागेवर आघाडी मिळाली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार भाजप 8 जागासह आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या ७ जागावर आहे.

    गोवा : गोव्यात निकाल यायला सुरुवात झाली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरसीचा सामना पाहायला मिळत आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस दोघांनी खातं उघडलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना एक-एक जागेवर आघाडी मिळाली होती. आता हाती आलेल्या अपडेटनुसार,काँग्रेसची मुसंडी, 20 जागांवर आघाडी, भाजप 16 जागांवर पुढे आहे.

    गोवा विधानसभा (Assembly Election 2022) ही देशातल्या सर्वांत छोट्या विधानसभांपैकी एक. मोजून 40 जागा असलेली ही विधानसभा तरीही साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा कोण गाठतो हे महत्त्वाचं आहे, तसं त्या आकड्याच्या जवळपास पोहोचणारे कोण आहेत हेही औत्सुक्याचं आहे. महाराष्ट्राचा हा सख्खा शेजारी असल्याने आणि सांस्कृतिकदृष्ट्या जवळीक मोठी असल्याने महाराष्ट्राचं तर अधिक लक्ष या निवडणुकीकडे आहे.

    उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. पणजीतून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. तर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मतमोजणी केंद्रात दाखल झाले आहेत. डॉक्टर प्रमोद सावंत हे सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

    देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी मतदान संपले आहे. राज्यात मतदान संपेपर्यंत 79.16% मतदान झाले. उत्तर गोव्याच्या जागांवर 80.24% मतदान झाले आहे, तर दक्षिण गोव्याच्या जागांवर 78.21% मतदान झाले आहे.